पृष्ठे

वयोमानानुसार मेंदू संथ होतो


******संतोष जाधव *****
वयोमानानुसार मेंदू संथ होतो,New
 असा आजपर्यंतचा समज होता. मात्र अनुभवातून भरपूर ज्ञान व माहिती मिळविल्यामुळे मेंदूची काम करण्याची क्षमता कमी होते, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे! हार्डडिस्क भरल्यानंतर संगणक ज्याप्रमाणे संथ गतीने काम करतो, त्याचप्रमाणे मेंदूच्या कार्याचेही होते, असे हे संशोधन सांगते. येथील ट्युबिनजेन विद्यापीठातील संशोधक डॉ. मायकेल रामसर व यांच्या गटाने हे संशोधन केले आहे.

"म्हातारपणी शब्द आठवण्यात अडचणी येतात. ही समस्या वयोमानाने निर्माण होते, असा आजपर्यंतचा समज होता. मात्र आम्ही संगणकाची आज्ञावली तयार करून त्याला मानवी मेंदूप्रमाणे बनविले. त्याला रोज काही नवीन वाचण्यास व नवी गोष्टी शिकण्यास दिल्या. सुरवातीच्या टप्प्यात ज्ञान तपासले असता संगणकाने एखाद्या तरुणाप्रमाणे वेगाने उत्तरे दिली. मात्र आयुष्यभरात मिळेल एवढी माहिती जमा झाल्यावर मात्र त्याचा वेग मंदावला व तो एखाद्या वृद्धाप्रमाणे काम करू लागला. संगणकाच्या माहितीचे विश्‍लेषण करण्याची प्रक्रिया संथ झाल्याने नव्हे, तर डाटाबेसला मिळालेल्या
 मिळालेल्या अधिक "अनुभवा‘मुळे तो संथ झाल्याचे समोर आले. या प्रयोगामुळे वृद्ध लोकांचा मेंदू संथ होण्यास आयुष्यात घेतलेले अनुभव व ज्ञानच जबाबदार असल्याचे सिद्ध झाले आहे,‘‘ असे डॉ. रामसर यांनी स्पष्ट केले.


तंत्रज्ञानामुळे आता एखादी व्यक्ती आयुष्यभरात किती शब्द शिकू शकते, हे समजते. त्याचा उपयोग करून अधिक ज्ञानामुळे मेंदूला लक्षात ठेवण्यात येणाऱ्या अडचणी आणि मेंदूची लक्षात ठेवण्याची मूळ क्षमता या दोन्हींचा वेगळा अभ्यास करणे शक्‍य होणार आहे. ""केवळ दोन जणांचे वाढदिवस माहिती असलेली व्यक्ती त्यांचे नाव व तारीख लगेचच आठवू शकते. मात्र दोन हजार जणांचे वाढदिवस माहिती असलेली व त्यातील दहापैकी नऊ जणांचे वाढदिवस बिनचूक सांगणाऱ्या व्यक्तीला तुम्ही पहिल्या व्यक्तीपेक्षा कमी स्मरणशक्ती असलेला मानणार का,‘‘ असा प्रश्‍नही पडतो.
 
यास ईमेल करा
हेब्लॉगकरा!
Twitter वर सामायिक करा
Facebook वर सामायिक करा
Pinterest वर सामायिक करा


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा