.......संतोष जाधव .......शासननिर्णय कसा शोधावा ??
"कोणताही शासननिर्णय ( GR ) कसा शोधावा "
नमस्कार शिक्षकमित्रहो ,
शासननिर्णय शोधणे सोपे आहे .आपण महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वर जावून कोणताही शासननिर्णय GR लगेच शोधु शकतो .पण त्याच्यासाठी काही तंत्र व क्लुप्त्या ,संदर्भ चा व तसेच कही माहिती चा वापर करावा लागतो .माझ्या माहिती प्रमाणे आपण जर 4 ते 5 पायरी चा वापर केला तर आपण कोणताही नवा जुना ,कधीचाही कोणताही GR .लगेच शोधु शकतो.
महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वरून शासननिर्णय कसा शोधावा .या संदर्भातील काही तंत्र व पायऱ्या खालीलप्रमाणे .
१ प्रथम महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वर म्हणजेच www.maharashtra.gov.in वर जावा .
२ या वेबसाईट च्या होमपेज वर आपल्याला शासननिर्णय हे बटन किंवा TAB दिसते .
३ शासननिर्णय बटनावर क्लिक केल्यावर शासननिर्णयाचे पेज ओपन होते .
यावर आपल्याला खालील बाजूला GR दिसतात व वर इतर मेनू दिसतात . प्रत्येक GR च्या डाउनलोड TAB ला क्लिक करून आपण GR डाउनलोड करू शकतो .
शासननिर्णय पेज वरील मेनुंची ओळख :
विभाग - विभाग सिलेक्ट करून विभागानिहाय GR शोधू शकतो. यामध्ये शासनाचे सर्व विभाग दाखवलेले आहेत .
महत्वाचा शब्द - यामध्ये शोधायच्या GR मधील महत्वाचा शब्द टाकून ' शोधा ' या बटनावर क्लिक करून GR शोधू शकतो .
दिनांकापासून / दिनांकापर्यंत - यामध्ये आपण ज्या दिवशीचा GR शोधायचा आहे, ती दिनांक टाकून " शोधा " या बटनावर क्लिक करा म्हणजे आपल्यासमोर त्या दिवशीचा GR ओपन होईल .
सांकेतांक -GR चा सांकेतांक टाकून आपण जो हवा तो GR मिळवू शकतो .
GR शोधत असताना आपल्याला शोधा या बटनावर क्लिक मारावी लागते . शोधून पुन्हा पहिल्या पेजवर येण्यासाठी पुनर्स्थापित या बटनावर क्लिक करावी .
धन्यवाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा