कल्पना चावला
कल्पना चावला
कल्पना चावला
कल्पना चावला (मार्च १७ इ.स. १९६२:कर्नाल,हरयाणा -- फेब्रुवारी १ इ.स. २००३:टेक्सासवर अंतराळात) ही अमेरिकन अंतराळवीर होती. ती भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला होती.
व्यक्तिगत माहिती संपादन करा
कल्पना बनारसीलाल चावला यांचा जन्मकर्नाल, हरयाणा येथे झाला.
शिक्षण संपादन करा
कल्पना चावला यांचे शालेय शिक्षण गावातील टागोर बाल निकेतन विद्यालयात झाले. पंजाब विद्यापीठातून त्यांनी १९८२ साली एरोनॉटिकल अभियांत्रिकी पदवी घेतली. पुढे १९८४मध्ये अर्लिङ्ग्टनच्या टेक्सास विद्यापीठातून एरोनॉटिकल उच्च अभियांत्रिकी शिक्षण करून घेऊन, त्यांनी कोलोराडो विद्यापीठातून एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातून १९८८मध्ये डॉक्टरेट मिळवली.
कार्य संपादन करा
डिसेंबर १९९४ साली चावला यांची अमेरिकेतील नासामध्ये १५व्या अंतराळवीर समूहात निवड झाली. मिशन विशेषज्ञ म्हणून त्यांनी एसटीएस-८७ वर काम केले. अवकाशात त्यांनी ३७६ तास व ३४ मिनिटे प्रवास केला.
मृत्यू संपादन करा
१ फेब्रुवारी २००३ या दिवशी अवकाशातून पृथ्वीवर परत येणार्या कोलंबिया अवकाशयानाचा स्फोट झाला. या स्फोटामुळे कोलंबियाचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले. या यानामध्ये असलेल्या कल्पना चावला यांचा आणि अन्य अंतराळवीरांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
कराडचे कल्पना चावला विज्ञान केंद्र संपादन करा
कल्पना चावला यांच्या मृत्यूने व्यथित झालेल्या कराडच्या टिळक ’ हायस्कूलमधील संजय पुजारी नावाच्या विज्ञान शिक्षकांनी कल्पना चावलांच्या वडिलांच्या, बनारसीलाल चावला यांच्या परवानगीने कराडमध्ये कल्पना चावला विज्ञान केंद्र सुरू केले आहे. हे केंद्र मुलांमध्ये विज्ञानाचा प्रसार करून त्यांना विज्ञानाची गोडी लावण्याचे कार्य करते.
मुलाला पडणार्या प्रश्नांची उत्तरे त्याला प्रत्यक्ष कृतीमधून शोधता आली पाहिजेत, विज्ञानाच्या निकषांवर त्याला विचार करता यायला पाहिजे, प्रयोग करता आले पाहिजेत, अशी अनेक उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून उभे केलेले हे ’कल्पना चावला विज्ञान केंद्र’, संजय पुजारी यांनी १ जुलै २००६ या दिवशी स्थापन केले.
कल्पना चावला विज्ञाना केंद्राचे कार्य कसे चालते, हे पाहण्यासाठी कल्पनाचे वडील बनारसीलाल चावला यांनी केंद्राला भेट दिली होती. त्यांनी केंद्राचे काम पाहून मोठी देणगीसुद्धा दिली. कल्पना चावला यांच्या भगिनी सुनीतादीदी यांनीही ५० हजार रुपये किमतीची पुस्तके या केंद्रासाठी दिली. भारतात या नावाचे हे एकमेव केंद्र असेल अशी ग्वाही बनारसीलाल यांनी दिली.
या विज्ञान केंद्राचे स्वतंत्र ग्रंथालय आहे. ग्रंथालयात निसर्ग, पर्यावरण, विज्ञानाच्या विविध मूलभूत शाखा यांविषयीची अनेक पुस्तके, विश्वकोश, चरित्रे, विज्ञानाशी संबंधित सीडी आणि डीव्हीडी असा मोठा संग्रह मुलांना संदर्भासाठी उपलब्ध करून दिला जातो.
‘शाळेबाहेरची शाळा’ असे या केंद्राच्या कार्याचे स्वरूप आहे. हसतखेळत आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विज्ञानाचे शिक्षण देणे हे कल्पना चावला विज्ञान केंद्राचे धोरण आहे. या दृष्टीने केंद्राचे समन्वयक म्हणून काम करणारे पुजारी सर आणि त्यांना मदत करणारे त्यांचे इतर शिक्षक सहकारी सतत प्रयत्नशील असतात.
केंद्राचे कार्यक्रम आणि उपक्रम संपादन करा
वर्षांतल्या ५२ रविवारी आणि अन्य सुट्ट्यांच्या दिवशी कल्पना चावला विज्ञान केंद्रामध्ये विविध विज्ञानविषयक कार्यक्रमांचे, उपक्रमांचे आयोजन केले जाते. आकाशनिरीक्षण, विमानांच्या आणि अग्निबाणांच्या प्रतिकृती, पक्षिनिरीक्षण, वनस्पतींची ओळख, औद्योगिक क्षेत्रांना तसेच विज्ञान संशोधन केंद्रांना भेटी, जंगलभ्रमंती, शास्त्रज्ञांची, तज्ज्ञांची व्याख्याने, खेळण्यांमधून विज्ञान समजून घेणे, शालेय पुस्तकातील विज्ञानाची तत्त्वे प्रयोगांच्या आधारे समजून घेणे अशा अनेकविध उपक्रमांच्या माध्यमांतून मुलांना विज्ञानाची गोडी लावण्याचे काम या विज्ञान केंद्रात केले जाते.
कल्पना चावला विज्ञान केंद्राचा साचेबद्ध असा कोणताही कार्यक्रम किंवा अभ्यासक्रम नाही, वेळापत्रक नाही, परीक्षा नाहीत आणि म्हणूनच कोणतेही ताणतणाव नाहीत. प्रत्येक रविवार वेगळा असतो. त्यामुळे मुलेसुद्धा प्रत्येक रविवारची आणि सुट्टीच्या दिवसाची वेगळ्या अर्थाने वाट पाहत असतात.
विज्ञान शिकण्याची वेगळी पद्धत संपादन करा
कल्पना चावला केंद्रात शिकविण्याची पद्धतसुद्धा वेगळी आहे. केंद्रातली मुले जर एखाद्या विमानाची प्रतिकृती तयार करणार असतील तर त्याआधी ही मुले विमानबांधणीशास्त्र, वायुगतीशास्त्र यातील संकल्पना स्लाइड शो किंवा फिल्म्सच्या माध्यमातून समजून घेतात. काही तज्ज्ञ व्यक्तींना या संदर्भात व्याख्यानासाठी आमंत्रित केले जाते. नंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुले विमानांच्या प्रतिकृती तयार करतात.
थोडक्यात, या उपक्रमामधून केवळ विमानांच्या प्रतिकृती करण्
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा