पृष्ठे

मेंदू ची साठवण क्षमता


******* संतोष जाधव ******
मेंदूची साठवण क्षमता बाबतNew
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
आपला मेंदू आपण समजतो त्यापेक्षा निदान दहा पटीने तरी अधिक कार्यक्षम व प्रभावी आहे असा निष्कर्ष अमेरिकेतील संशोधकांनी काढला आहे. मानवी मेंदूची अत्यंत गुंतागुंतीची, संरचना समजून घेण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ अद्यापही प्रयत्नरत आहेत. त्यातूनच हा अत्यंत महत्त्वाचा शोध जगासमोर आलाय.
कित्येक निसर्गनिर्मित गोष्टींचा उलगडा करण्यासाठी, या विश्वातील गूढ रहस्य उकलण्यासाठी मानव त्याच्या मेंदूचा वापर करून शतकानुशतके धडपड करत आला आहे. अर्थातच त्याला या प्रयत्नांमध्ये इतर अवयवांचीही साथ मिळालीच; पण सर्वात बहुमोल ठरला तो मेंदूच! काही लाख वर्षापूर्वी आपला मेंदू विकसित झाला, उत्क्रांतीचा सर्वोत्तम टप्पा मानवाने व त्याच्या मेंदूने गाठला म्हणून तर आज कितीतरी क्षेत्रांमध्ये, कामांमध्ये अफाट झेप आपण घेतलेली आहे. मानवी मेंदूची शक्ती, मर्यादा या किती आहेत हे अद्याप आपल्याला ओळखता आलेलं नाही. त्याची मोजमापं आपल्याला माहीत आहेत, मात्र त्याची गहनता आपल्याला माहीत नाही.
मेंदू हा आपल्या शरीरातला सर्वात प्रभावी व नाजूक अवयव. म्हणून तर त्याच्याभोवती डोक्याच्या जाड त्वचेचं व केसांचं आवरण असतं. तुम्ही करत असलेली प्रत्येक गोष्ट ही याच मेंदूकडून नियंत्रित होत असते. म्हणून तर काही कारणाने मेंदूची कार्यक्षमता काही प्रमाणात गमावलेल्या लोकांना परावलंबी जीणं जगावं लागतं. तर असा हा आपला मेंदू, ज्याची आजवर हजारो पद्धतीने शास्त्रीय व वैज्ञानिक चिकित्सा झालेली आहे. तो किती कार्यक्षम असू शकतो याचा पूर्ण पुरावा अजूनही आपल्याकडे नाही. मेंदू वाढत्या वयानुसार विकसित होत जातो व त्याचं हे शिकणं कधीच थांबत नाही. तर अशा या मेंदूत आपण लाखो गोष्टींची साठवण करून ठेवत असतो.
 माणूस वयाची जितकी र्वष जगतो, तितक्या वर्षातल्या सा-या गोष्टी या मेंदूतच तर साठवलेल्या असतात. मग एवढय़ा सगळ्या गोष्टींची साठवणूक व जपणूक देखील एवढासा लहान आपला मेंदू नावाचा अवयव करत असेल तर त्याची माहिती साठवण्याची क्षमता कितीतरी मोठी असली पाहिजे. मेंदूच्या साठवण क्षमतेविषयी शास्त्रज्ञ गेली अनेक र्वष संशोधन करत आहेत. मात्र ही क्षमता किती असेल याच्या अंतिम निष्कर्षापर्यंत ते पोहोचले नव्हते. आता मात्र मेंदूमधील चेतापेशींच्या जाळ्याची गुंतागुंत आणि मेंदूचा आकार यासंबंधी महत्त्वाचं संशोधन करून आपल्या मेंदूची क्षमता ही आपण समजत होतो त्यापेक्षा दहा पटीने जास्त असावी असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे. त्यासाठी अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील ला जोला येथील साक इन्स्टिटय़ूटच्या संशोधक शास्त्रज्ञांनी उंदराच्या मेंदूतील हिप्पोकॅम्पस भागातील न्यूरॉन्स म्हणजे चेतातंतूंवर काही प्रयोग केले. यात त्यांनी अद्ययावत मायक्रोस्कॉपी व संगणकीय अल्गोरिदमचे सहाय्य घेऊन उंदराच्या मेंदूच्या थ्रिडी इमेजेस तयार केल्या व त्याच्या एकूण संरचनेचा अभ्यास केला.
त्यांच्या प्रयोगात जे आढळलं ते थक्क करणारे निष्कर्ष आहेत. साक इन्स्टिटय़ूटचे प्राध्यापक आणि संशोधक टेरी सेनोस्की यांनी हा अत्यंत क्रांतिकारी शोध असल्याचं म्हटलं आहे. आपला मेंदू हा एक महाकाय यंत्रासारखा आहे. ज्यात हजारो, लाखो प्रक्रिया या बिनबोभाट सुरू असतात. माणसाच्या जन्मापासून हे मेंदू नावाचे यंत्र आपोआपच सुरू होते व मृत्यूपर्यंत ते तसेच सुरू राहते. तुलनेने बाहेरील जगातील कोणत्याही यंत्रापेक्षा लहान असला तरी प्रत्यक्षात मेंदू हेच या निसर्गातील, जगातील अवाढव्य यंत्र आहे. इतक्या गहन प्रक्रिया तिथे सुरू असतात. अर्थातच कोणत्याही क्रिया-प्रक्रियांसाठी माणसाचे विचार व त्याची
स्मृती ही आवश्यक असते.
जी बाहेरील ज्ञानातून तयार होत असते. आता देखील तुम्ही हा लेख वाचताना तुमच्या मनात काहीतरी विचार येत असतील व इथे म्हटलेल्या गोष्टींशी संबंधित काही गोष्टी तुम्हाला आठवत असतील. आपले विचार आणि स्मृती हे मेंदूतील विविध रासायनिक व विद्युत पद्धतींवर अवलंबून असतात, त्यांचाच ते परिपाक असतात असं म्हणायला हरकत नाही आणि या प्रक्रियांमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात ते न्यूरॉन्स म्हणजे चेतातंतू. जेव्हा दोन चेतातंतूंमध्ये‘संवाद’ घडतो तेव्हा एखाद्या तारेतून विद्युतप्रवाह जातो, त्याप्रमाणे तेव्हा ती तार स्वरूपी जागा म्हणजे दोन चेतातंतूंमधील सिनॅप्स म्हटली जाते.
हे सिनॅप्स दोन न्यूरॉन्सच्या टोकांना जोडतात. यातील एक असतो अ‍ॅक्सॉन व दुस-या टोकाला डेंड्राईट म्हणतात. न्यूरोट्रान्समीटर्स नामक रसायनं या दोन न्यूरॉन्सच्या टोकांमधून संदेशांची देवाण-घेवाण करतात. ही प्रक्रिया जिथे घडते ती जागा म्हणजे सिनॅप्स. याच सिनॅप्सच्या संबंधी एक अत्यंत महत्त्वाचा शोध आता या संशोधकांनी जाहीर केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ही सिनॅप्स म्हणजे दोन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा