.......संतोष जाधव.......5वी 8वी स्कॉलरशिप माहिती
*इयता ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा शुल्क*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इयत्ता ५ वी स्तर ) व पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी स्तर ) करीता अटी व शर्ती निश्चित करणेबाबत .
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन निर्णय क्रमांक :- एफईडी- ४०१४/६१३/प्र.क्र.4/एसडी-५
मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०००३२
दिनांक :- १५ नोव्हेंबर ,२०१६
या शासन निर्णयातील
मुद्दा क्रमांक ०८) *अर्ज* :-
सदर परिक्षेचे अर्ज हे विद्यार्थी शिकत आसलेल्या शासन मान्यताप्राप्त शाळेच्या मुख्याध्यापकामार्फत ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ठरविलेल्या वेळापत्रकानुसार सादर करावेत . ( Website: http://www.mscepume.in)
०९) *परीक्षा शुल्क* :-
बिगरमागास्वर्गीय विद्यार्थ्यांसाठी
प्रवेश शुल्क रु . २०/-
परीक्षा शुल्क रु. ६०/-
एकूण रु. ८०/-
अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती , भटक्या जाती - विमुक्त जमातीच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी
प्रवेश शुल्क रु . २० /-
परीक्षा शुल्क रु . ०० /-
एकूण रु. २० /-
याशिवाय प्रत्येक सहभागी शाळेला प्रतिवर्षी रु. २०० /- नोंदणी शुल्क परिक्षा परीषदेकडे जमा करावे लागेल .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा