पृष्ठे

संगितामूळे मेंदू चा फायदा



छंद संगीताचा फायदा मेंदूचा.New
.
गेल्या दशकामध्ये ई-माध्यमे आणि वर्तमानपत्रांमध्ये ‘मोझार्ट परिणाम’ याबाबत आलेल्या बातम्यांमुळे बरीच राळ उडाली होती. वुलफँग ‍ऍमॅड्युअस मोझार्ट - हे युरोपीय शास्त्रीय संगीतातले उस्ताद रचनाकार. त्यांच्या संगीतरचना एका शाळेत परिक्षेच्या वेळी हलक्या आवाजात लावल्या होत्या, त्या मुळे परिक्षा देणार्‍यांना नेहमीपेक्षा अधिक यश मिळाले - असा दावा काही संशोधकांनी केलेला. त्याच्या म्हणण्यानुसार त्याच वर्गातल्या, त्याच वयाच्या, तशीच आर्थिक वगैरे पार्श्वभूमी असणार्‍या अन्य विद्यार्थ्यांच्या परिक्षेच्या वर्गात असे संगीत वाजवण्यात आले नाही त्यांना कमी गुण मिळाल्याचे आढळले. ही बातमी वणव्यासारखी पसरली आणि आपल्या पाल्यांच्या यशासाठी धडपडणार्‍या पालकांनी आपल्या पाल्यांना मोझार्टचे संगीत ऐकवायला सुरुवात केली. त्यांना आशा होती की ‘मोझार्ट परिणाम’ होईल आणि आपल्या पाल्याला वरच्या दर्जाचे यश मिळेल.

मोझार्ट परिणामाच्या सत्यासत्यतेबद्दल अन्य संशोधकांनी आणि पत्रकारांनीही बर्‍याच शंका उपस्थित केल्या. एखाद्या छोट्या गटावर झालेल्या एका प्रयोगाचे निष्कर्ष सर्वांना लागू होऊ शकतात का?  केवळ संगीत ऐकल्याने मन स्थिर झाले आणि हाती घेतलेले कार्य व्यवस्थित पार पडले – हे शक्य आहे का? तसे असेल तर मग मोझार्टच का? बिथोवेन, बाख किंवा बिटल्स यांच्या संगीत रचना का नाहीत? पाश्चात्य संगीतच कशाला हवे? हिंदुस्थानी, कर्नाटकी किंवा जपानी संगीत किंवा आरत्या स्तोत्रे ऐकवली तर? शिवाय हा परिणाम होतच असेल तर तो तात्पुरता का दीर्घकालीन? बाळांना झोपवण्यासाठी म्हंटली जाणारी अंगाईपण बाळांच्या मेंदूची वाढ करत असेल का?

प्रश्न पडले म्हंटल्यावर त्यांची उत्तरे शोधण्यासाठी बरेच प्रयोग केले गेले. नवख्या लोकांनी केले तसे मुरलेल्या संशोधकांनीही केले. सर्वसाधारणपणे संगीताचा परिणाम फायदेशिर होतो असा निष्कर्ष ढोबमानाने निघाला पण ‘मोझार्ट परिणाम’ – याबद्दल मात्र खात्रीशिर निष्कर्ष कोणी काढला नाही एवढे खरे.

संगीतामुळे मेंदूत असे काही बदल होतात किंवा मेंदूवर असे काही परिणाम होतात की ज्यामुळे तुमची आकलनशक्ती वाढते – हे वैज्ञानिक पद्धतीने शोधणे हे एक आव्हानात्मक काम आहे. संगीत नुसते कानावर पडणे पुरेसे आहे की प्रत्यक्ष गायन वादन करणे आवश्यक आहे? शिवाय हे गायन वादन एकट्याने करणे जास्त परिणामकारक आहे की समूहात करणे अधिक परिणामकारक आहे? गायन किंवा वादन करणारी व्यक्ती काहीतरी कृती करत असते, ऐकताना नाही. मग दुसर्‍या शब्दात सांगायचे तर खरा ‘मोझार्ट परिणाम’ होण्यासाठी नेमके काय उपयुक्त आहे ऐकणे की वाजवणे?

याबाबत वरमाँट येथील बालक, युवक आणि कुटुंब केंद्रात काम करणार्‍या प्रा. जेम्स हुडझिऍक यांनी प्रयोग केले. त्यात त्यांनी ६ ते १८ वयोगटातील २३२ मुलांच्या मेंदुचा अभ्यास केला. प्रयोगासाठी प्योत्र इलियाच तायकोव्हस्की या प्रख्यात रशियाय़ी संगीतकाराच्या – नट क्रॅकर स्वीट – या रचनेचा वापर केला गेला. २३२पैकी प्रत्येक मूल काही ना काही वाद्य वाजवणारे होते आणि त्यातही नट क्रॅकर स्वीट ही रचना ते नक्की वाजवत. प्रत्येक मुलाच्या मेंदूचा फंक्शनल एम आर आय घेण्यात आला. त्यात संगीताच्या वादनामुळे मेंदूच्या बाह्यावरणात फरक पडल्याचे आढळून आले. विशेषत: मेंदूच्या ज्या भागातून बारीक हालचालींचे नियंत्रण केले जाते, लक्षात ठेवण्याची कामगिरी केली जाते, ध्यान देण्याची क्रिया होते तसेच भावी काळासाठीची रचना आणि व्यवस्थापन केले जाते अशा मेंदूच्या आवरणाच्या ठिकाणी हे बदल अधिक झालेले आढळले. सविस्तर माहितीसाठी पहा – J. Am. Acad. Child Adolesc. Psycharity. Dec 2014. DOI 10.1016/j.jac – 2014.06.015 show

हुडझिऍक यांच्या प्रयोगांचा निष्कर्ष असा निघतो की – व्यायाम करून जसे शरीर बळकट होते तसे संगीत वादनाने मेंदूतील संबंधीत भाग बळकट होतात आणि तेही दीर्घकाळासाठी.
www.sciencedaily/com/releases/2014/12/141223132546.htm या संकेत स्थळावर संगीतामुळे होणार्‍या परिणामांबरोबरच एकंदर - मेंदू आणि आकलनशक्ती याबाबतही वाचावयास मिळते.
डॉ. अमी स्प्रे आणि डॉ. जी. मेयर यांनी युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूल येथे केलेल्या संशोधनानुसार संगीत शिक्षणामुळे मेंदूच्या विशेषत: डाव्या – भाषाविकासासाठी उपयोगी असणार्‍या – भागातील रक्तप्रवाह वाढून तेथील चैतन्य वाढते.
जॉन हाफकिन विद्यापीठातील डॉ. चार्ल्स लिंब आणि सहकार्यांनी केलेले संशोधन लक्षणीय आहे. त्यांनीही वादकांवरच प्रयोग केले. हे वादक २५ ते ५६ या वयोगटातले आणि जाझ संगीत वाजवणारे होते. प्रयोगात वापरण्यासाठी वाद्ये खास प्रकारे बनवून घेतला होती. विशेषत: वाद्यांच्या पट्ट्या किंवा बटणे धातूची न बनवता प्लॅस्टिकची बनवली होती. फंक्शनल एम आर आय काढतान

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा